"ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार"
- शिक्षणमहर्षीडॉ. बापूजी साळुंखे
शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालायत दिनांक १४ जानेवारी २०२३ (शनिवार) रोजी भूगोल विभागामार्फत भूगोल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भूगोल विभागामार्फत
प्रा.प्रवीण तळेकर (सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग,सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय
कराड) यांचे " जागतिक हवामान बदल व समस्या " या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात पृथ्वीगोलाची पूजा करून करण्यात आली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सन्माननीय
प्राचार्य डॉ. महेश गायकवाड,ज्युनियर महाविद्यालयाचे सुपरवायझर प्रा.सुरेश रजपूत ,वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी प्रा.सचिन बोलाईकर, प्रा.सुरेश यादव व सर्व गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख प्रा.
एस. डी. कांबळे यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा. एस.ए.काकडे यांनी करून दिली. कार्यक्रमासाठी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चे माजी विद्यार्थी हि मोठ्या संखेने उपस्थित होते. भूगोल दिनाचे औचीत्य्य साधून विभाग मार्फत ५००० /- रुपये महाविद्यालयाच्या एन. सी .सी युनिटला देण्यात आले. माजी विद्यार्थ्यांनी विभागासाठी सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट दिली. कु.करिष्मा पवार व अनिकेत कुंभार तसेच माजी विद्यार्थी विनायक कांबळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शोभा लोहार यांनी केले तर आभार प्रा. डॉ. पी. वाय. साळुंखेयांनी मानले .