Monday, January 16, 2023

भूगोल दिन - १४ जानेवारी २०२३


 

 "ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार" 

                                    -  शिक्षणमहर्षीडॉ. बापूजी साळुंखे 

शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालायत  दिनांक १४ जानेवारी २०२३ (शनिवार)  रोजी भूगोल विभागामार्फत भूगोल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भूगोल विभागामार्फत प्रा.प्रवीण तळेकर (सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग,सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय कराड) यांचे  " जागतिक हवामान बदल व समस्या " या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात पृथ्वीगोलाची पूजा करून करण्यात आली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सन्माननीय  प्राचार्य डॉ. महेश गायकवाड,ज्युनियर महाविद्यालयाचे सुपरवायझर प्रा.सुरेश रजपूत ,वरिष्ठ व कनिष्ठ  महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी प्रा.सचिन बोलाईकर, प्रा.सुरेश यादव व सर्व गुरुदेव कार्यकर्ते  उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक  भूगोल विभाग प्रमुख प्रा. एस. डी. कांबळे यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा. एस.ए.काकडे यांनी करून दिली. कार्यक्रमासाठी शैक्षणिक वर्ष  २०२०-२१ चे माजी विद्यार्थी हि मोठ्या संखेने उपस्थित होते. भूगोल दिनाचे औचीत्य्य साधून विभाग मार्फत  ५००० /- रुपये महाविद्यालयाच्या एन. सी .सी  युनिटला देण्यात आले. माजी विद्यार्थ्यांनी विभागासाठी सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट दिली. कु.करिष्मा पवार व अनिकेत कुंभार तसेच माजी विद्यार्थी विनायक कांबळे  यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन   प्रा. शोभा लोहार यांनी केले तर आभार प्रा. डॉ. पी. वाय. साळुंखेयांनी मानले .















Tuesday, January 10, 2023

ग्रंथालयास भेट (१३ डिसेंबर २०२२)

 

 दिनांक १३ डिसेंबर २०२२ रोजी शिक्षणमहर्षी बापुजी साळुंखे महाविद्यालयातील भूगोल विभागा मार्फत  महाविद्यालयातील ग्रंथालयास भेट देण्यात आली. यामध्ये  विध्यार्थ्यांना ग्रंथालयातील  भूगोल  विषयाची संदर्भ  व अभ्यासक्रम पाठ्यपुस्तके यांची माहिती व्हावी हा प्रमुख उद्देश होता. ग्रंथालयातील भूगोल  विषयाची विविध मासिके व  ती कशी शोधावीत ,  इतर अवांतर वाचनाची पुस्तके व त्यांची ग्रंथालयातील रचना , ओपॅक सिस्टम कशी वापरावी ,   ग्रंथालयाचे  नियम तसेच वर्षभराचे उपक्रम याच्या विषयी महाविद्यालयाच्या ग्रंथपाल प्रा.रांगोळे मॅडम यांनी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांसमवेत विभागाच्या प्रा. शोभा लोहार उपस्थित होत्या. या उपक्रमासाठी विभाग प्रमुख प्रा. एस.डी .कांबळे याचे मार्गदर्शन लाभले .प्रा.काकडे सर व प्रा.साळुंखे यांचे सहकार्य लाभले.










जागतिक पर्यटन दिन (३० सप्टेंबर २०२२)

 

"ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार" या ध्येयाने प्रेरित होऊन  शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालायत अनेक विद्यार्थी केंद्रित उपक्रम वर्षभर राबविले जातात, त्यातीलच एक उपक्रम म्हणजे  दिनांक ३०  सप्टेंबेर २०२२, वार - शुक्रवार  रोजी भूगोल विभागामार्फत साजरा केलेला 'जागतिक पर्यटन दिन'. जागतिक पर्यटन दिनानिमित्त भूगोल विभागामार्फत प्रा.अवधूत कुलकर्णी  ( सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग,महिला महाविद्यालय कराड) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील जेष्ठ प्राध्यापक व समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. ए.जी.खोत सर तेसेच स्टाफ सेक्रेटरी  व इतिहास विभाग प्रमुख प्रा. बोलाईकर उपस्थित होते . या कार्यक्रमाचे नियोजन करताना महाविद्यालयाचे सन्माननीय  प्राचार्य डॉ. महेश गायकवाड, भूगोल विभाग प्रमुख प्रा. एस. डी. कांबळे याचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमासाठी भूगोल विभागातून प्रा . एस. ए . काकडे , प्रा. डॉ. पी. वाय. साळुंखे व  प्रा. शोभा लोहार उपस्थित होते.





Tuesday, September 20, 2022

ओझोन थर बचाव दिन (१६ सप्टेंबेर २०२२)


 "ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार" या ध्येयाने प्रेरित होऊन  शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालायत अनेक विद्यार्थी केंद्रित उपक्रम वर्षभर राबविले जातात, त्यातीलच एक उपक्रम म्हणजे दिनांक १६ सप्टेंबेर रोजी भूगोल विभागामार्फत साजरा केलेला 'ओझोन थर बचाव दिन'. ओझोन थर बचाव दिनानिमित्त भूगोल विभागामार्फत बी. ए  भाग २ च्या भालदार अल्फाज , सवार एजाज, विशाल साळुंखे या विद्यार्थ्यानी प्रा. शोभा लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या  भित्तिपत्रिकेचे उद्घाटन महाविद्यालयाचे सन्माननीय प्रभारी प्राचार्य डॉ. महेश गायकवाड यांच्या हस्ते झाले. ही भित्तिपत्रिका तयार करण्यासाठी भूगोल विभाग प्रमुख प्रा. एस. डी. कांबळे तसेच प्रा . एस. ए . काकडे व प्रा. डॉ. पी. वाय. साळुंखे यांनी सहकार्य केले. 











भूगोल दिन - १४ जानेवारी २०२३

   "ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार"                                      -  शिक्षणमहर्षीडॉ. बापूजी साळुंखे  शि...