Tuesday, January 10, 2023

जागतिक पर्यटन दिन (३० सप्टेंबर २०२२)

 

"ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार" या ध्येयाने प्रेरित होऊन  शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालायत अनेक विद्यार्थी केंद्रित उपक्रम वर्षभर राबविले जातात, त्यातीलच एक उपक्रम म्हणजे  दिनांक ३०  सप्टेंबेर २०२२, वार - शुक्रवार  रोजी भूगोल विभागामार्फत साजरा केलेला 'जागतिक पर्यटन दिन'. जागतिक पर्यटन दिनानिमित्त भूगोल विभागामार्फत प्रा.अवधूत कुलकर्णी  ( सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग,महिला महाविद्यालय कराड) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील जेष्ठ प्राध्यापक व समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. ए.जी.खोत सर तेसेच स्टाफ सेक्रेटरी  व इतिहास विभाग प्रमुख प्रा. बोलाईकर उपस्थित होते . या कार्यक्रमाचे नियोजन करताना महाविद्यालयाचे सन्माननीय  प्राचार्य डॉ. महेश गायकवाड, भूगोल विभाग प्रमुख प्रा. एस. डी. कांबळे याचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमासाठी भूगोल विभागातून प्रा . एस. ए . काकडे , प्रा. डॉ. पी. वाय. साळुंखे व  प्रा. शोभा लोहार उपस्थित होते.





No comments:

Post a Comment

भूगोल दिन - १४ जानेवारी २०२३

   "ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार"                                      -  शिक्षणमहर्षीडॉ. बापूजी साळुंखे  शि...